Shreya Maskar
बॉलिवूडचा रूह बाबा कार्तिक आर्यनने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
नुकतीच कार्तिक आर्यनला इंजिनिअरची पदवी प्राप्त झाली आहे.
कार्तिक आर्यनने 'डी. वाय. पाटील' विद्यापीठातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.
कार्तिकने इन्स्टाग्रामवर आपल्या आयुष्यातील या सुंदर क्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "बॅकबेंचर ते आज मंचावर उभं राहून पदवी स्वीकारण्यापर्यंतचा माझा प्रवास"
सध्या कार्तिक आर्यनवर प्रेमाचा, कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर 'भूल भुलैया ३' हा रिलीज झाला होता.
कार्तिक आर्यनचा मोठा चाहता वर्ग आहे.