Chetan Bodke
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार ज्युनियर मेहमूद यांचं वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची कॅन्सरशी झुंज सुरु होती, ७ डिसेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्युनियर मेहमूद यांचं खरं नाव नईम सय्यद असे असून त्यांनी सिनेकारकिर्दित ७ वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
नईम सय्यद यांना ज्युनियर मेहमूद हे नाव मेहमुद अली यांनी दिले होते.
ते एक अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सुद्धा होते. त्यांनी ६ मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले.
ज्युनियर मेहमूद आणि सचिन पिळगावकर यांनी बाल कलाकार म्हणून करिअरची एकत्रित सुरुवात केली होती.
मेहमूद आणि सचिन यांनी ‘बचपन’, ‘गीत गाता चल’ आणि ‘ब्रह्मचारी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.
ज्युनियर मेहमूद यांनी ‘नौनिहाल’ चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीमध्ये डेब्यू केलं होतं.
‘परिवार’, ‘ब्रह्मचारी’, ‘फरिश्ता’, ‘प्यार ही प्यार’, ‘कटी पतंग’, ‘आन मिलो सजना’, ‘कर्ज चुकाना है..’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.