Chetan Bodke
अभिनेता रितेश देशमुखने मनोरंजन विश्वात उत्तम कामगिरी करत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अभिनयासह रितेश देशमुखने त्याच्या फॅशन स्टाईलने चाहत्यांना प्रभावित करत असतो.
नुकतंच रितेशने आणि त्याची पत्नी जेनिलियाने 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०२३' मध्ये हजेरी लावली होती.
यावेळी रितेशने स्पेशल आऊटफिट परिधान करत सोशल मीडियावर खूप सुंदर फोटो शेअर केले.
ब्लॅक कलरचा कोट आणि फॉर्मल शर्ट पँट असा रितेशने लूक केलेला आहे.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये, रितेश- जेनिलियाला 'वेड' चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटो रितेश चाहत्यांसोबत शेअर करतो.
रितेशची स्टाईल अनेकदा इंडस्ट्रितील सेलिब्रिटी कॉपी करण्याचा प्रयत्न करतात.