Akshay Khanna Birthday: 'या' एका करणामुळे अक्षय खन्ना ५ वर्षे बसला होता घरी

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेता

बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Akshay Khanna | Social Media

धाकटा मुलगा

अभिनेता अक्षय खन्ना हा दिवगंत अभिनेते विनोद खन्ना यांचा धाकटा मुलगा आहे.

Akshay Khanna | Social Media

येथून केलं शिक्षण पूर्ण

अक्षयने मुंबईतील बॉम्बे इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले.

Akshay Khanna | Social Media

महाविद्यालयीन शिक्षण

अक्षयने उटी येथील लॉरेन्स स्कूलमधून ११ वी आणि १२ वीचे शिक्षण घेतले.

Akshay Khanna | Social Media

या चित्रपटातून केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

अक्षय खन्नाने पंकज पराशर याच्या रोमॅन्टिंक ड्रामा 'हिमालय पुत्र' या चित्रपटातून पदार्पण केले.

Akshay Khanna | Social Media

सुपरहिट चित्रपट

यानंतर अक्षयने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Akshay Khanna | Social Media

या सिनेमात केलय काम

अक्षयने दिल चाहता है, हंगामा, हलचल, आ अब लौट चलें, बॉर्डर, ताल या सिनेमात काम केले आहे.

Akshay Khanna | Social Media

असा लागला करिअरला ब्रेक

मात्र काही काळ अक्षय खन्नाच्या करिअरला ब्रेक लागला ज्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याची केस गळती.

Akshay Khanna | Social Media

ही होती समस्या

१९ व्या वर्षापासूनच अक्षय खन्ना केस गळतीच्या समस्येचा सामना करत होता. करिअरमध्ये पुढे जात असताना अक्षय खन्नाची ही समस्या वाढली.

Akshay Khanna | Social Media

५ वर्षे होता घरी

यामुळे अनेकदा अक्षय खन्नाचा कॉन्फिडन्स कमी झाला. २७ वर्षांच्या करिअरमध्ये अक्षय खन्ना जवळपास ५ वर्षे घरी बसला होता.

Akshay Khanna | Social Media

NEXT: Sonali Kulkarni: सोनाली कुलकर्णीचं गुलाबी सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा