Chetan Bodke
अनेक सेलिब्रिटी मंडळी, फिट राहण्यासाठी मांसाहार किंवा अंडी खातात. पण, बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे शाकाहरी असून फुल्ल फिट आहेत.
अनेक सेलिब्रिटी लाईफस्टाईलप्रमाणे डाएट बदलत असतात. अशातच, आम्ही तुम्हाला १० सेलिब्रिटींची नावं सांगणार आहोत, जे शुद्ध शाकाहारी आहेत.
तरीही त्यांचा फिटनेस भल्याभल्यांनाही लाजवेल असा आहे. हे १० बॉलिवूड सेलिब्रिटी मांसाहारापासून दूर राहतात, तरीही तंदुरुस्त आहेत.
विद्युत जामवाल नेहमीच अफलातून ॲक्शन सीन्ससाठी त्याची बॉलिवूडमध्ये ओळख आहे. तो शुद्ध शाकाहरी आहे.
अभिनय आणि दमदार शरीरयष्टीसाठी ओळखला जाणारा जॉन अब्राहमसुद्धा शुद्ध शाकाहरी आहे.
आपल्या लुक्समुळे मुलींमध्ये लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. पण हा सुद्धा शुद्ध शाकाहारी आहे.
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा प्राणी प्रेमी असल्याचे सांगितले जाते. ती सुद्धा शुद्ध शाकाहरी आहे.
बॉलिवूडची पंगा गर्ल म्हणून चर्चेत राहणाऱ्या कंगना राणौतने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतल्यापासून तिच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे ती शुद्ध शाकाहारी बनली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर कधी तरी चिकन खायची पण 'नीरजा' चित्रपटाच्या शूटिंगनंतर तिने नॉनव्हेज खाणे बंद केले.
बॉलिवूड अभिनेत्रीने विद्या बालन जेव्हापासून शुद्ध शाकाहारी झाली, तेव्हापासून तिची स्कीन तेव्हापासून अधिकच उजळ झाल्याचे एका मुलाखतीत सांगितलं होतं.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरला वडिलांनी 'लाइफ इज द फेअर' हे पुस्तक भेट म्हणून दिले होते. पुस्तक वाचल्यानंतर तो शुद्ध शाकाहरी झाला.
बिग बी अमिताभ बच्चन ही शुद्ध शाकाहरीच आहेत.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खानची सर्वत्र ओळख. त्याने 'दंगल' चित्रपटासाठी वजन कमी केले होते. त्यासाठी तो शुद्ध शाकाहारी झाला होता.