Chetan Bodke
टॉलिवूड अभिनेत्री प्रियामणी राज कायमच आपल्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
सध्या प्रियामणी 'आर्टिकल ३७०' या चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आली आहे.
प्रियामणीने नुकतेच इन्स्टाग्रामवर शिमरी साडीमध्ये सुंदर फोटोशूट करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
स्टायलिश अंदाजामध्ये साडी, हटक्या अंदाजामध्ये फॅशन करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
गळ्यामध्ये डायमंड नेकलेस आणि केसामध्ये गजरा असा अभिनेत्रीने लूक केला असून तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहे.
ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर आणि फॅन्सी लिपस्टिक लावून अभिनेत्रीने आपला मेकअप पूर्ण केलेला आहे.
प्रियामणीच्या ह्या फोटोवर लाखो लाईक्स मिळाले असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
प्रियामणी ही बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची चुलत बहीण आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे.
प्रियामणीने कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.