Shruti Vilas Kadam
सई ताम्हणकर लवकरच ‘मटका किंग’ या वेब सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सिरिजमध्ये सई ‘बरखा’ ही महत्त्वाची भूमिका साकारणार असून तिच्या कॅरेक्टरबद्दल उत्सुकता वाढली आहे.
सिरिजच्या प्रमोशनदरम्यान सईने निळ्या रंगाची आकर्षक साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या साडीसोबत तिने फुलस्लीव्ह ब्लाऊज परिधान करत एलिगंट आणि क्लासी लूक कॅरी केला.
सईने नो मेकअप लूक ठेवत स्मोकी आय इफेक्ट दिला, ज्यामुळे तिचा लूक अधिक नॅचरल आणि स्टायलिश दिसला.
तिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सई ताम्हणकर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही यशस्वी ठरत असून, येत्या काळात ती आणखी नव्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे.