Boiled Potato: शिळा उकडलेला बटाटा खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?

Surabhi Jayashree Jagdish

रेझिस्टंट स्टार्च

उकडलेला बटाटा थंड झाल्यानंतर त्यातील काही स्टार्चचे रूपांतर रेझिस्टंट स्टार्चमध्ये होते. हा स्टार्च सामान्य कार्बोहायड्रेटप्रमाणे लगेच पचत नाही. त्यामुळे तो शरीरात वेगळ्या पद्धतीने कार्य करतो.

Resistant Starch | saam tv

पचनसंस्थेसाठी फायदेशीर

रेझिस्टंट स्टार्च आतड्यांमध्ये फायबरप्रमाणे काम करतो. त्यामुळे अन्नाचं पचन अधिक सुरळीत होण्यास मदत मिळू शकते. पोटातील काही पचनासंबंधी तक्रारी कमी करण्यासाठीही तो उपयुक्त ठरू शकतो.

Digestive Health | saam tv

चांगल्या बॅक्टेरियांचं पोषण

हा स्टार्च थेट मोठ्या आतड्यापर्यंत पोहोचतो. त्याठिकाणी असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांना तो पोषणाचा स्रोत उपलब्ध करून देतो. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

Weight Loss Foods | saam tv

वजन कमी करण्यास

शिळा उकडलेला बटाटा खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे वारंवार भूक लागण्याची शक्यता कमी होते. वजन नियंत्रण किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Healthy Carbohydrates | saam tv

कोलेस्ट्रॉल

रेझिस्टंट स्टार्च आणि फायबर शरीरातील चरबीच्या चयापचयावर सकारात्मक परिणाम करू शकतात. काही संशोधनांनुसार ते कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही त्याचा फायदा होण्याची शक्यता असते.

Boiled Potato Benefits | saam tv

कोणी मर्यादित प्रमाणात खावा?

शिळा उकडलेला बटाटा बहुतेक लोकांसाठी सुरक्षित मानला जातो. मात्र मधुमेह, गॅसचा त्रास किंवा किडनीशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी तो मर्यादित प्रमाणात खावा.

Healthy Digestion | saam tv

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू नये?

Gas problem vegetables | saam tv
येथे क्लिक करा