ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अंडीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. अनेक जण प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी अंडीचा आहारात समावेश करतात.
काहींना ऑमलेट खायला आवडतं तर काहींना उकडलेली अंडी, परंतु काय खाल्ल्याने शरीराला जास्त फायदा होतो.
तज्ञांच्या मते उकडलेली अंडी शरीरासाठी अधिक फायदेशीर असतात.
यामध्ये कोणत्याही प्रकारचे तेल किंवा तूप वापरण्यात येत नाही यामुळे यात कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण कमी असते. जे शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे.
उकडलेली अंडी खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मिळतात.
उकडलेल्या अंडीमध्ये ऑमलेटपेक्षा कमी कॅलरीज असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज उकडलेल्या अंडीचा आहारात समावेश करु शकता.
आरोग्याच्या दृष्टीने ऑमलेट अनहेल्दी आहे. कारण यामध्ये तेल आणि मसाल्यांचा वापर केला जातो. चवीसाठी तुम्ही ऑमलेट खाऊ शकता.
अंडीचा आहारात समावेश केल्याने आरोग्याला काही महत्वपूर्ण फायदे होतात. हृदयाच्या आरोग्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी अंडी फायदेशीर आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: पिगमेंटेशन आणि डार्क स्पॅाट्समुळे हैराण? चमचाभर कोरफडीचा करा 'असा' वापर; चेहरा चमकेल