शरीराच्या 'या' भागावर सतत सूज येतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतात हृदय, यकृत आणि किडनीशी संबंधित गंभीर आजार

Manasvi Choudhary

शरीरावर सूज येण्याचे संकेत

शरीराच्या कोणत्याही भागात आलेली सूज ही कोणताही आजार नसला, तरी ते शरीराच्या अंतर्गत चाललेल्या एखाद्या गंभीर समस्येचे किंवा आजाराचे संकेत असू शकते.

Body Swelling Causes

वेळीच घ्या आरोग्याची काळजी

शरीरात सूज ही गंभीर दुखापत, कीटकांचा चावा किंवा औषधांच्या दुष्परिणामामुळे येते. परंतु, जर कोणतीही दुखापत नसताना अचानक शरीरावर सूज येत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

Body Swelling Causes | Yandex

शरीराच्या विविध भागामधील सूज

शरीरातील विविध अवयवांमध्ये जेव्हा गंभीर होते, तेव्हा शरीर सूज येण्याच्या माध्यमातून एखाद्या आजाराचे संकेत देऊ शकते. शरीराच्या वेगवेगळ्या भागांतील सूज वेगवेगळ्या आजारांशी संबंधित असू शकते.

Body Swelling Causes | Yandex

पाय सुजण्याची मुख्य कारणे

१) पाय किंवा घोट्यांवर सूज येणे ही एक सामान्य समस्या वाटू शकते. परंतू याकडे वेळीच लक्ष देणे महत्वाचे आहे.

२) जास्त वेळ एकाच जागेवर उभे राहणे किंवा पाय सोडून बसणे. तसेच, महिलांना गर्भधारणेदरम्यान पायांवर सूज येते.

Causes of Swollen Feet

३) पायांच्या शिरांमधील दोष, रक्ताच्या गाठी, किंवा हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता यामुळे पायांवर सूज येते. हे फुफ्फुसाच्या गंभीर आजाराचे देखील लक्षण असू शकते.

४) हृदय रक्ताभिसरण व्यवस्थित कार्य करत नसेल तर तर शरीराच्या पाणी साचून पायांना सूज येते.

Swollen Feet Reasons

५) किडनीच्या आजारांमध्ये मूत्रपिंड शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी घटक बाहेर टाकत नाही तेव्हा चेहऱ्यावर आणि पायांवर सूज येते.

६) यकृताचे आजारांमध्ये लिव्हरच्या कमकुवत कार्यामुळे पोटात आणि पायांमध्ये द्रव पदार्थ साचतो आणि पायांमध्ये सूज येते.

Heart and Kidney Care

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

next: जिमला जायची गरज नाही! हे 5 व्यायाम केल्याने मांड्यांवरची चरबी होईल कमी

Thigh Fat Loss Exercises
येथे क्लिक करा..