ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गोड-आंबट चव असलेल्या ब्लूबेरी सहज खाता येतात, चव वाढवण्यासाठी थोडे काळे मीठ शिंपडू शकता.
ब्लूबेरी नाश्त्यात घेण्याचा उत्तम पर्याय म्हणजे त्यांचा ज्यूस, ब्लेंडरमध्ये फिरवून गाळा आणि ताजं प्या.
ब्लूबेरी, केळी आणि स्ट्रॉबेरी मिसळून बनवलेली स्मूदी स्वादिष्ट असून आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त पेय ठरते.
चिया पुडिंगमध्ये ब्लूबेरीज घालून तुम्ही नाश्ता अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवू शकता, हे उत्तम संयोजन आहे.
दही नाश्त्यासाठी पसंतीचं असेल, तर त्यात ब्लूबेरी मिसळा आणि पौष्टिकतेसह चवदारपणे नाश्ता करा.
ओट्समध्ये ब्लूबेरी टॉपिंग म्हणून घालून तुम्ही नाश्ता अधिक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट बनवू शकता.
केक किंवा मफिनच्या पिठात ब्लूबेरी मिसळा किंवा टॉपिंगसाठी वापरा, त्यांची रसाळ चव अगदी अप्रतिम लागते.
ताज्या फळांच्या बाऊलमध्ये ब्लूबेरी सॅलड घालून खा; हे स्वादिष्ट मिश्रण पोट भरवते आणि ऊर्जा देतं.