ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चहा म्हटलं की, आपल्याला ग्रीन टी, ब्लू टी किंवा कदाचित लेमन टीचा विचार येतो. परंतु, गेल्या काही वर्षांत चहाचा आणखी एक प्रकार खूप लोकप्रिय झाला आहे तो म्हणजे ब्लू टी.
ब्लू टी ला बटरफ्लाय फ्लावर टी असेही म्हणतात. बटरफ्लाय फ्लावर टी म्हणजेच अपराजिता किंवा शंखपुष्पीचे फूल. हा चहा प्यायल्याने शरीराला कोणते आरोग्यदायी फायदे होतात, जाणून घ्या.
ब्लू टी ही एक हर्बल टी आहे जी गरम पाण्यात वाळलेल्या अपराजिताच्या फुलांपासून बनवली जाते. चहाचा रंग नैसर्गिकरित्या गडद निळा होतो. जर तुम्ही त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब घातले तर तो जांभळा होतो.
ब्लू टीमध्ये कॅफिन नसते आणि यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. ज्यामुळे हेल्दी वजन कमी होण्यास मदत होते.
तज्ञांच्या मते, ब्लू टी प्यायल्याने मेटबॉलिजम म्हणजेच पचनाची गती वाढते. पचनाची गती वाढल्याने शरीर कॅलरीज जलद बर्न करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
ब्लू टी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास मदत करते. यामुळे पोटफुगी कमी होते तसेच ब्लोटिंगची समस्या होत नाही.
ब्लू टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे प्रदूषण, ताणतणाव आणि अनहेल्दी अन्नामुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमच्या शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.