Manasvi Choudhary
सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे आणि लग्नसमारंभात महिला व तरुणी खास साडी आणि लेहेंगा परिधान करतात.
साडी किंवा लेहेंग्यामध्ये अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी त्यावर सूट होणारा स्टायलिश ब्लाऊज निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते.
सध्या फॅशन ट्रेंडमध्ये असलेल्या ५ हटके ब्लाऊज डिझाईन्स जे साडी आणि लेहेंग्यावर शोभून दिसतील.
तुम्हाला पार्टी किंवा लग्नसमारंभासाठी ग्लॅमरस लूक हवा असेल, तर बॅकलेस ब्लाऊज निवडू शकता. सिल्क, सॅटीन आणि शिफॉन साडीवर दोरी किंवा नाजूक पट्टी असलेला बॅकलेस ब्लाऊज खूप उठून दिसतो.
सध्या पफ स्लिव्ह्ज ब्लाऊज मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगमध्ये आहेत. खांद्याजवळ फुगवटा असलेली ही डिझाईन पारंपारिक आणि मॉडर्न अशा दोन्ही साड्यांवर छान दिसते.
युनिक आणि नाजूक लूक हवा असल्यास बाह्यांसाठी नेट किंवा ऑर्गेन्झासारखे कापड वापरलेले ट्रान्सपरंट हॅन्ड ब्लाऊज बेस्ट ठरतात.
स्क्वेअर-नेक ब्लाऊज दिसायला साधा असला तरी अत्यंत मोहक आणि एलिगंट लूक दिसतो. या ब्लाऊजचा गळा चौकोनी आकाराचा असल्याने दागिनेही खुलून दिसतात.