Blouse Design: ब्रायडल,रिसेप्शन आणि कॉकटेल पार्टीसाठी परफेक्ट; २०२६मध्ये ट्रेंडी आहेत ब्लाउजचे हे स्टायलिश डिझाइन्स

Shruti Vilas Kadam

कॉर्सेट स्टाइल ब्लाउज

कॉर्सेट स्टाइल ब्लाउज साडीला मॉडर्न आणि ग्लॅमरस लूक देतो. फिटेड डिझाइनमुळे हा ब्लाउज विशेष उठून दिसतो. प्लेन सिल्क, ऑर्गेन्झा किंवा सॅटिन साडीसोबत हा ब्लाउज सुंदर दिसतो. लग्नातील रिसेप्शन किंवा कॉकटेल पार्टीसाठी हा बेस्ट पर्याय आहे.

Blouse Designs

केप स्लीव्ह्ज ब्लाउज

नेहमीच्या ब्लाउजपेक्षा वेगळा लूक हवा असल्यास केप स्लीव्ह्ज डिझाइन निवडा. खांद्यावरून खाली येणाऱ्या हलक्या केपमुळे साडीला आकर्षक आणि एलिगंट लूक मिळतो. रिसेप्शन किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी हा ब्लाउज साडी किंवा लेहेंग्यासोबत उठून दिसतो.

Blouse Designs

पफ स्लीव्ह्ज ब्लाउज

पफ स्लीव्ह्ज म्हणजे खांद्याला फुगवट्याच्या आकाराच्या असलेला ब्लाउज. पारंपरिक आणि रेट्रो लूक आवडणाऱ्या हिलांसाठी हा पर्याय उत्तम आहे. बनारसी, सिल्क किंवा शिफॉन साडीसोबत हा ब्लाउज घातल्यास लूकला वेगळीच शोभा येते.

Elbow Length Blouse Designs

हॉल्टर नेक ब्लाउज

हॉल्टर नेक ब्लाउजमध्ये गळ्याभोवती आधार देणारी डिझाइन असते. कॉकटेल पार्टी, संगीत किंवा रिसेप्शनसाठी सॅटिन, जॉर्जेट आणि ऑर्गेन्झा साडीसोबत हा ब्लाउज घालता येतो.

Plan Saree Designer Blouse

डीप बॅक आणि डोरी डिझाइन

ब्लाउजच्या मागच्या बाजूला डीप कट, डोरी आणि आकर्षक लटकन असलेले डिझाइन साध्या साडीला ग्लॅमरस टच देते. बनारसी, पैठणी किंवा सिल्क साडीसोबत हे डिझाइन छान दिसते.

Dori Blouse Designs

एम्ब्रॉयडरी आणि मिरर वर्क ब्लाउज

भरतकाम, मिरर वर्क, सिक्विन किंवा मोत्यांची सजावट असलेले ब्लाउज सण आणि लग्नसमारंभासाठी क्लासी पर्याय आहेत. साध्या साडीसोबत हे ब्लाउज घातल्यास संपूर्ण पोशाख उठून दिसतो.

Red Blouse Designs

व्ही-नेक ब्लाउज

व्ही-नेक ब्लाउज क्लासिक आणि स्टायलिश लूक देतो. त्यावर हलके भरतकाम, सोनेरी बॉर्डर किंवा साधे फिनिशिंग करता येते. सिल्क, कॉटन, शिफॉन आणि जॉर्जेट साड्यांसोबत या ब्लाऊजचे प्रकार अधिक उठून दिसतात.

Plan Saree Designer Blouse

Egg Benefits: मेंदू, डोळे ते शरीरातील हाडं...; रोज २ उकडलेली अंडी खाल्ली तर कोणते बदल होतात?

Egg Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा