ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचा परिणाम मूत्रपिंडावर आणि डोळ्यांवर होऊ शकतो.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.
रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी 100-125 mg/dl नॅार्मल मानली असते. आणि जेवणानंतर 140 mg/dl पर्यंत रक्तातील साखरेची पातळी नॅार्मल मानली जाते.
जर एखाद्याचा ब्लड शुगर लेवल ७० पेक्षा कमी असेल तर त्याचे आरोग्यावर काही गंभीर परिणाम होऊ शकतात.
घाबरणे, घाम येणे,चक्कर येणे, चिडचिड,डोकेदुखी आणि अनियनित हृदयाचा ठोका अशा समस्या उद्भवू शकतात.
रक्तातील साखरेची पातळी १८० पेक्षा जास्त असल्यास हाय ब्लड शुगर लेवलची समस्या होऊ शकते.
ब्लड शुगर लेवल वाढल्यास डोळ्यांच्या समस्या आणि किडनीच्या समस्या उद्भवू शकतात.
ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनात योग्य लाइफस्टाइल आणि हेल्दी डाएटचा समावेश करु शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: तुमच्या नखांचा रंग बदलतोय तर तर असू शकतं हे गंभीर कारण