Omkar Sonawane
जी लोक जास्त प्रमाणात चिंता करतात, स्ट्रेस घेतात या लोकांमधील काही हार्मोन अॅक्टिव होतात, यामध्ये कोर्टीसॉल आणि एड्रेनालिन मुख्य हार्मोन आहे. गोड पदार्थ खाणे बंद करून देखील शुगर वाढत असेल तर त्यामागे तणाव एक कारण असू शकते.
तणावाच्या वेळी शरीरामध्ये अनेक हार्मोन्स अॅक्टिव्ह होतात. मात्र रक्तातील साखरेच्या पातळीच्या संदर्भात कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालिन या हार्मोन्सची सर्वाधिक वाढले जाते.
कॉर्टिसोलसारखे स्ट्रेस हार्मोन्स रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. तणावाच्या दरम्यान लिव्हरमध्ये असलेला ग्लुकोज हा रक्तात जातो.
अॅड्रेनालिन शरीराला तातडीने ऊर्जा मिळवून देण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू शकते.
दीर्घकाळ तणाव, खराब झोप आणि स्ट्रेस हार्मोन्समुळे शुगरला नियंत्रण कठीण होऊ शकते.
पुरेशी झोप, नियमित व्यायाम, मेडिटेशन, योग्य आहार आणि मित्रांसोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरू शकते.
संतुलित आहारासोबत तणाव, झोप आणि शारीरिक हालचालींकडेही लक्ष देणे महत्वाचे आहे. वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे.