Blood Group and Diabetes: A, B, AB की O? कोणत्या ब्लड ग्रुपला डायबिटीजचा सर्वाधिक धोका?

Surabhi Jayashree Jagdish

B रक्तगट आणि डायबिटीज

संशोधनानुसार B रक्तगट असलेल्या लोकांमध्ये टाइप-२ डायबिटीजचा धोका इतर रक्तगटांच्या तुलनेत सर्वाधिक आढळतो. २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात यापूर्वी झालेल्या अनेक अभ्यासांच्या निष्कर्षांचं एकत्रित विश्लेषण करण्यात आलं. त्यामध्ये B रक्तगट असलेल्या लोकांमध्ये इतर रक्तगटांच्या तुलनेत टाइप-२ डायबिटीजचा धोका सुमारे २८ टक्के जास्त दिसून आला.

Blood Group and Diabetes | saam tv

डायबिटीज होतोच असे नाही

B रक्तगट असणं म्हणजे त्या व्यक्तीला डायबिटीज होणारच असं नाही. रक्तगट हा डायबिटीजच्या धोक्याशी जोडलेला एक घटक असू शकतो. पण त्यावरून एखाद्या व्यक्तीला पुढे डायबिटीज होईल असं ठरवता येत नाही.

O Blood Group | saam tv

O रक्तगट

काही अभ्यासांमध्ये O रक्तगट असलेल्या लोकांमध्ये टाइप-२ डायबिटीजचा धोका कमी दिसून आला आहे. मात्र O रक्तगटामुळे हा धोका कमी का दिसतो, याचं कारण अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.

Blood Group Diabetes Connection | saam tv

रक्तगट आणि डायबिटीजचा संबंध

रक्तगट आणि डायबिटीज यांच्यात हा संबंध का दिसतो, याचं ठाम कारण सध्या सांगितलेलं नाही. AB आणि O सारखे रक्तगट शरीरातील रक्तवाहिन्या आणि काही बायोलॉजिकल प्रोसेसशी संबंधित असतात. शरीरातील सूज, रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची प्रक्रिया आणि रक्तवाहिन्यांचे काम यावर रक्तगटाचा काही संबंध असू शकतो का, याचा अभ्यास केला जातो.

Diabetes Symptoms | saam tv

डायबिटीजचा धोका कशामुळे वाढतो?

रक्तगट आणि डायबिटीज यांच्यातील संबंधाला डायबिटीजचे थेट कारण मानता येत नाही. वजन नियंत्रणात ठेवणे, नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे या सवयी डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पुरेशी झोप घेणं आणि वेळोवेळी रक्तातील साखरेची तपासणी करणंही उपयोगी ठरतं.

Blood Sugar | saam tv

दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकतं?

रक्तातील साखर दीर्घकाळ जास्त राहिल्यास शरीरातील रक्तवाहिन्या आणि नसांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हार्ट अटॅक, किडनीचे आजार, डोळ्यांच्या दृष्टीशी संबंधित समस्या आणि नसांचं नुकसान होण्याचा धोका वाढू शकतो.

Healthy Lifestyle | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Weight management | saam tv
येथे क्लिक करा