Bloating Home Remedies: थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं? रोज 'हा' काढा प्या, पोटाला मिळेल आराम

Shruti Vilas Kadam

कोमट पाणी प्या

पावसाळ्यात दिवसभर पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.

Bloating Home Remedies

काढा प्या

१ ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये १ चमचा बडिशेप अर्धा चमचा धने आणि पाव चमचा जिरे घाला. हे पदार्थ शरीरातला वात कमी करून पचन चांगलं होण्यासाठी मदत करतात.

Home Remedies for Constipation

जेवण व्यवस्थित चावून खा

घाईघाईने जेवल्याने पोटात हवा जाण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक घास व्यवस्थित चावून सावकाश जेवणे फायदेशीर ठरते.

Home Remedies for Constipation

जड आणि तेलकट पदार्थ कमी करा

पावसाळ्यात तळलेले, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते. मात्र अशा पदार्थांमुळे पचनास त्रास होऊन पोट फुगणे किंवा जडपणा जाणवू शकतो.

Constipation Home Remedy

प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश करा

दही किंवा इतर प्रोबायोटिक पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ल्याने आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे पचनक्रियेसाठी हे पदार्थ उपयोगी ठरू शकतात.

home remedies constipation

दररोज थोडा व्यायाम करा

पावसामुळे घराबाहेर जाणे शक्य नसले तरी घरच्या घरी चालणे, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम करता येतो. शारीरिक हालचालींमुळे आतड्यांची हालचाल सक्रिय राहण्यास मदत होते.

constipation remedies

जेवणाची वेळ आणि दिनचर्या सांभाळा

अनियमित वेळेत जेवणे, खूप उशिरा जेवणे किंवा सतत स्नॅक्स खाणे टाळा. नियमित दिनचर्या आणि पुरेशी झोप पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे.

home remedies for constipation

Weight Loss: रोज व्यायाम आणि डाएट करूनही वजन वाढतंय? मग 'या' 7 कारणांमुळे होत नसेल वजन कमी

Weight Loss
येथे क्लिक करा