Shruti Vilas Kadam
दिवसभर चेहऱ्यावर धूळ, घाम आणि तेल जमा होते. त्यामुळे सकाळी आणि रात्री सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील घाण आणि अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.
चेहरा धुताना कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे चेहऱ्यावरील तेल आणि घाण स्वच्छ होण्यास मदत होते. मात्र, खूप गरम पाण्याने चेहरा धुवू नका. त्यामुळे त्वचा कोरडी पडू शकते.
नाकावर वारंवार ब्लॅकहेड्स येत असतील, तर सॅलिसिलिक अॅसिड असलेला फेसवॉश वापरू शकता. यामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल आणि घाण कमी होण्यास मदत होते. सुरुवातीला कमी प्रमाणात वापरा.
चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि त्वचेतील ओलावा टिकून राहतो. तुमच्या त्वचेला योग्य असे हलके मॉइश्चरायझर निवडा.
चेहऱ्यावर जास्त तेल येत असेल, तर आठवड्यातून एकदा क्ले मास्क लावा. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते. मात्र, त्वचा कोरडी असेल तर याचा जास्त वापर करू नका.
ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी चेहरा जोरात घासू नका. तसेच खडबडीत स्क्रब वापरणे टाळा. यामुळे त्वचेवर जळजळ आणि लालसरपणा येऊ शकतो. चेहरा नेहमी हलक्या हाताने स्वच्छ करा.
नाकावर ब्लॅकहेड्स दिसले की अनेकजण ते नखांनी दाबून काढतात. पण असे करू नका. यामुळे त्वचेवर जखमा, सूज आणि डाग पडू शकतात. ब्लॅकहेड्स जास्त असतील तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.