Shruti Vilas Kadam
१ चमचा बेकिंग सोडा आणि १ टीस्पून पाणी यांचा पेस्ट तयार करा. ही पेस्ट ब्लॅकहेड्सच्या भागावर हलक्या हाताने मसाज करा आणि ५ मिनिटांनी गुनगुने पाण्याने चेहरा धुवा.
ब्लॅकहेड्स असतील तर जास्त scrubbing टाळा. सौम्य क्लेंझर, हलकी मसाज आणि दररोजचे व्यवस्थित क्लिनिंग पाळल्यास ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत मिळते.
गरम पाण्याच्या वाफेमुळे pores उघडतात. त्यामुळे dead skin, तेल आणि घाण मऊ पडून ब्लॅकहेड्स काढणे सोपे होते.
बेंटोनाइट, फुलर अर्थ किंवा काळी माती यांसारखे क्लेय मास्क pores मधील तेल आणि घाण शोषून घेतात. आठवड्यातून एकदा लावल्यास ब्लॅकहेड्स कमी होतात.
कडक scrubs ऐवजी AHA/BHA सारखे सौम्य केमिकल exfoliant वापरा. आठवड्यात १–२ वेळा वापरल्यास pores साफ राहतात आणि ब्लॅकहेड्स कमी होतात.
एग-व्हाईट, मध, दही, लिंबू, हिरवा चहा किंवा घरगुती सौम्य मास्क त्वचेचे pores साफ करून ब्लॅकहेड्स कमी करण्यास मदत करतात.
ब्लॅकहेड्स दाबून किंवा ओढून काढल्यास त्वचेला इजा होऊन डाग किंवा इन्फेक्शन होऊ शकते. स्वच्छ साधन आणि सौम्य पद्धत वापरणेच योग्य.