Alisha Khedekar
काळा असो किंवा पिवळा, गुळात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे डायबिटीज रुग्णांनी तोही मर्यादित प्रमाणातच खावा.
काळा गूळ कमी प्रक्रियायुक्त असू शकतो, पण त्याचा अर्थ रक्तातील साखर वाढत नाही, असा अजिबात नाही.
पिवळा गूळ दिसायला स्वच्छ आणि आकर्षक असला तरी डायबिटीजसाठी तो सुरक्षित आहे, असे समजणे चुकीचे ठरू शकते.
गुळातील कार्बोहायड्रेट्स शरीरात ग्लुकोजमध्ये बदलतात. त्यामुळे जास्त गूळ खाल्ल्यास रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.
डायबिटीज असल्यास गुळाचे प्रमाण डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवणे योग्य. स्वतःहून नियमित सेवन करू नये.
गुळात लोह, कॅल्शियम आणि काही खनिजे असू शकतात; मात्र त्यासाठी गूळ खाणे आवश्यकच आहे असे नाही.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा