Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लग्नानंतर महिलांच्या साजश्रृंगाराला विशेष महत्व असते.
महिलांच्या साजश्रृंगारापैकी एक म्हणजे मंगळसुत्र. लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात.
मंगळसूत्रामध्ये काळे मणी असतात यामागचं नेमकं कारण काय आहे हे जाणून घेऊया.
धार्मिक मान्यतेनुसार, मंगळसूत्रातील काळे मणी हे वाईट नजरेपासून रक्षण करतात.
मंगळसूत्रातील काळे मणी हे देवी शक्तीचे प्रतीनिधीत्व करतात जी शक्ती संरक्षणाचे प्रतीक मानली जाते.
सोन्याच्या मंगळसूत्रात काळे मणी असण्याचे कारण म्हणजे काळा रंग नकारात्मक लहरी शोषून घेतो यामुळे लग्नात कोणताही त्रास होत नाही.
मंगळसूत्रातील काळे मणी शनि ग्रहाचे प्रतीक मानले जातात आणि हे मणी पती-पत्नीवरील शनीच्या अडथळ्यांना स्वतःवर घेतात, ज्यामुळे पतीच्या जीवनात आनंद राहतो अशी मान्यता आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.