Sakshi Sunil Jadhav
आजच्या मॉडर्न महिलांना जड आणि मोठ्या डिझाइनपेक्षा नाजूक, मिनिमल वर्क आणि हलके मंगलसूत्र जास्त आवडतात.
आधुनिक मंगलसूत्र डिझाइन्समध्ये ट्रेडीशनल आणि फॅशनचा खास टच दिला जात आहे.
पती-पत्नीच्या नावाचे पहिले अक्षर किंवा इनिशियल्स असलेले मंगलसूत्र सध्या खूप लोकप्रिय झाले आहेत.
ऑफिस, कॅज्युअल आउटिंग किंवा रोजच्या वापरासाठी हे इनिशियल डिझाइन हलके आणि स्टायलिश असतात.
छोटं गोल्ड पेंडंट, ब्लॅक बीड्स चेन किंवा डायमंड टच असलेली डिझाइन्स नववधूंमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
हे मंगलसूत्र कोणत्याही आउटफिटसोबत सहज मॅच होतात आणि दिवसभर घालायलाही आरामदायक असतात.
महाराष्ट्रीयन, गुजराती आणि साउथ इंडियन स्टाइलमधील पारंपरिक मंगलसूत्र आता मॉडर्न लूकमध्ये उपलब्ध आहेत.
काळ्या आणि सोन्याच्या मण्यांचे डबल लेयर कॉम्बिनेशन असलेले मंगलसूत्र डेली वेअरमध्येही एलिगंट लूक मिळतो.