Shruti Vilas Kadam
बिस्किटांमध्ये साखर, मैदा आणि चरबीचे प्रमाण जास्त असल्याने रोज सेवन केल्यास वजन झपाट्याने वाढू शकते.
गोड बिस्किटे नियमित खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हल वाढून मधुमेहाचा धोका निर्माण होतो.
मैदा आणि कृत्रिम घटकांमुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटीसारख्या तक्रारी वाढू शकतात.
बिस्किटांमधील ट्रान्स फॅट आणि जास्त मीठ हृदयासाठी अपायकारक ठरू शकते.
बिस्किटांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी असल्याने शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही.
रोज बिस्किटे खाल्ल्याने खऱ्या जेवणाची भूक कमी होते आणि चुकीच्या आहाराची सवय लागते.
साखरयुक्त बिस्किटांमुळे दात किडणे आणि तोंडाच्या समस्या उद्भवू शकतात.