Shreya Maskar
बिस्किट केक बनवण्यासाठी बिस्किट, मैदा, बेकिंग पावडर, पिठी साखर, बेकिंग सोडा, ड्रायफ्रूट्स, दूध, टूटी फ्रूटी आणि चोको चिप्स इत्यादी साहित्य लागते.
बिस्किट केक बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये मीठ टाकून १० मिनिटांसाठी मध्यम आचेवर प्री-हीट करायला ठेवा. गॅस मध्यम आचेवर ठेवून द्या.
एका बाऊलमध्ये बिस्किटांचा चुरा, कोमट दूध घालून चांगले मिक्स करा. तर दुसरीकडे ड्रायफ्रूट्स कापून घ्या.
त्यानंतर यात पिठी साखर टाकून मिश्रण एकजीव करा आणि काही मिनिटे बाजूला ठेवा. जेणेकरून मिश्रण चांगले मिक्स होईल.
केकचा ट्रे घ्या त्यावर तूपाचा हात फिरवा. यानंतर त्यात थोडा मैदा टाकून डस्टिंग करून घ्या. जेणेकरून केक शिजल्यावर खाली भांड्याला चिकटणार नाही.
तयार मिश्रणात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, टूटी फ्रूटी, चोको चिप्स आणि कापलेले ड्रायफ्रूट्स घालून चांगले मिक्स करा. सतत ढवळत रहा.
शेवटी थोडे दूध टाकून सगळे मिश्रण पुन्हा व्यवस्थित हलवून घ्या. त्यानंतर बेकिंग ट्रेमध्ये भरा आणि कुक करण्यासाठी कुकरमध्ये ठेवा.
गॅसच्या मध्यम आचेवर ३०-३५ मिनिटे कुकरमध्ये केक शिजवून घ्या. केकेमध्ये सुरी घाला. जर सुरीला सरळ केक बाहेर आली, सुरीला केक लागला नसेल तर समजून जा की तुमचा बिस्किट केक तयार झाला आहे. याचा तुम्ही आस्वाद घ्या.