Manasvi Choudhary
कोणताही कार्यक्रम असला की घरी बिर्यानी हा पदार्थ ठरलेला असतो. बिरयानी घरी बनवण्याची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बिर्याणीसाठी बासमती तांदूळ चविष्ट लागतो. बासमती तांदळाची सोपी बिर्याणी रेसिपी आहे
बिर्याणी बनवण्यासाठी बासमती तांदूळ, कांदा, हिरवी मिरची, वेलची, दालचिनी, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, जिरे, मीठ, कोथिंबीर, पुदिणा पाने, तूप हे साहित्य एकत्र करा.
सर्वप्रथम बासमती तांदूळ एक तास आधी पाण्यात भिजत घालायचे म्हणजे ते चांगले फुलतात. भात चिकट होत नाही.
गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या त्यात मीठ, साखर,तूप घाला आणि उकळवा.
पाणी उकळले की त्यात भिजवलेले बासमती तांदूळ घाला. तांदूळ शिजवून झाल्यानंतर त्याला झाकण लावा.
नंतर मसाला तयार करण्यासाठी आलं- मिरची लसूण पेस्ट, उभा कांदा चांगले परतून घ्या. यात तिखट मसाला, मीठ, हळद हे घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचे आहे.
नंतर या मिश्रणात पुदीन्याची पाने आणि बिर्याणी मसाला घालून चांगले ढवळून घ्या.
मध्यम आचेवर शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. नंतर त्यावर कोथिंबीर आणि तूप घालून गरमागरम बिर्याणी सर्व्ह करायची आहे.