Sakshi Sunil Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो म्हणजेच शेवनेरी किल्यावर. या किल्याबद्दलचा महत्वाचा इतिहास आपण पुढे जाणून घेणार आहोत.
पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेला हा किल्ला डोंगरमाथ्यावर असल्याने शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी योग्य होता.
सातवाहन काळात शिवनेरी परिसर महत्त्वाचा व्यापार मार्ग होता. त्यामुळे या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जास्त वाढले.
शिवनेरी किल्ल्याला मुघल साम्राज्य व शिवाजी महाराजांच्या सैन्यातील संघर्षाचा इतिहास लाभला आहे.
जुन्नर हे प्राचीन व्यापार केंद्र होते. त्यामुळे शिवनेरीचा परिसर सदैव व्यापारी आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा राहिला.
किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर असून, याच देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांना "शिवाजी" हे नाव देण्यात आले.
किल्ल्यावर पाण्यासाठी सात टाकी (पाण्याचे साठे) बांधण्यात आले होते, जे आजही ऐतिहासिक वास्तूंचा भाग आहेत.
मराठा साम्राज्यानंतर किल्ला इंग्रजांच्या अखत्यारीत गेला आणि लष्करी उपयोगासाठी वापरला गेला.