Manasvi Choudhary
बर्ड फ्लूची लक्षणे अचानक दिसतात आणि ती तीव्र स्वरूपाची असतात
कोणतीही लक्षणे न दिसता कोंबड्यांचा अचानक आणि मोठ्या संख्येने मृत्यू होणे हे बर्ड फ्लूचे सर्वात मोठे लक्षण आहे.
कोंबड्याचे खाणे आणि पाणी पिणे थांबते त्या सुस्त होऊन एकाच जागी बसतात.
नाका तोंडातून रक्तामिश्रित स्त्राव बाहेर येणे हे बर्ड फ्लूचे लक्षण मानले जाते.
श्वास घेताना घरघर आवाज येतो. कोंबड्यांना दम लागल्यासारखे होते.
कोंबड्यांच्या डोक्याचा भाग, डोळे आणि मानेला सूज येते. तसेच त्यांच्या डोक्यावरील तुरा आणि गळ्याखालील मांसल भाग निळसर किंवा काळा पडतो.
कोंबड्यांना नीट चालता येत नाही, त्या गोल-गोल फिरतात किंवा मान वेडीवाकडी करतात.