ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या राज्यभर कडक उन्हाळा सुरु आहे.
मात्र सध्या या कडक उन्हाळ्यातही अनेकजण बाईक रायडिंगसाठी जाण्याचा प्लॅन करत असतात.
मात्र या उन्हात बाईक रायडिंगसाठी कोणती काळजी घेतली पाहिजेत ते पाहुयात.
यावेळी काही फळे किंवा कुलिंग जॅकेट असे काही महत्त्वाचे साहित्य सोबत ठेवावेत.
उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील पाण्याते प्रमाण कमी होते त्यामुळे सोबत पाणी बॉटल ठेवावी.
बाईकचा स्पीड जास्त असल्याने गरम वारे शरीरावर आदळतात त्यामुळे तुम्हाला त्रास जाणवू शकतो.
उन्हाळ्यात सुती कपडे परिधान करण्याचा सल्ला दिला जातो,त्यातही बाईक रायडिंग करताना शक्यतो सुती कपडे परिधान करावे.
उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो सकाळी लवकर प्रवास सुरु करावा,ज्यामुळे उन्हाचा तडाखा लागणार नाही.