Dhanshri Shintre
अमेझॉनने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२५ जाहीर केला आहे. मात्र, सेलच्या अचूक तारखा अजून स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे ग्राहक प्रतीक्षेत आहेत.
ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, साउंडबार, लॅपटॉप, एसीसह विविध प्रोडक्ट्स आकर्षक सूट आणि स्वस्त दरात खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Samsung Galaxy S24 Ultra वर खास ऑफर्स उपलब्ध असतील. यासाठी कंपनीने सेलची मायक्रोसाइट आधीच लाईव्ह करून ग्राहकांची उत्सुकता वाढवली आहे.
अमेझॉन सेलदरम्यान iPhone, Samsung, iQOO, OnePlusसह अनेक लोकप्रिय ब्रँडच्या स्मार्टफोनवर मोठ्या सवलती आणि आकर्षक ऑफर्स मिळणार असून ग्राहकांसाठी ही उत्तम खरेदीची संधी ठरणार आहे.
या सेलमध्ये ग्राहकांना फ्लॅट डिस्काउंटसह बँक ऑफर्स, एक्सचेंज बोनस आणि अतिरिक्त फायदे दिले जातील. खरेदीदारांना सर्व ऑफर्सचा लाभ घेण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.
नवीन फोन, टीव्ही, लॅपटॉप किंवा होम अप्लायन्स खरेदीचा विचार करत असाल, तर या सेलमध्ये तुम्हाला आकर्षक डील्स आणि किफायतशीर ऑफर्सचा लाभ मिळू शकतो.
अमेझॉनने अजून डील्स आणि सेलच्या तारखांची घोषणा केलेली नाही. तथापि, ही ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल १५ सप्टेंबरनंतर सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२५ दरम्यान, ग्राहकांना HP i5 13th Gen प्रोसेसर लॅपटॉप ५० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
अमेझॉन सेलमध्ये Asus VivoBook, Lenovo IdeaPad आणि इतर ब्रँडच्या लॅपटॉपवर खास डिस्काउंट मिळणार आहे. त्यासोबत विविध स्मार्टफोन्सवरही आकर्षक डील्स उपलब्ध होणार आहेत.