Chetan Bodke
'बिग बॉस मराठी ३' च्या माध्यमातून अभिनेत्री स्नेहा वाघ पुन्हा एकदा टिव्ही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय झाली.
सध्या स्नेहा कलर्स टिव्हीवरील 'नीरजा एक नयी पेहचान' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी स्नेहा वाघ सध्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच स्नेहाने इन्स्टाग्रामवर फॅन्सी साडी वेअर करत सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने ट्रान्सफरन्सी साडी वेअर केली असून त्यावर डायमंड डिझायनिंगचा ब्लाऊज वेअर केला आहे.
मोकळे केस, ग्लॉसी मेकअप, डार्क रेड लिपस्टिक असा तिने आपला लूक पुर्ण केला आहे.
अभिनेत्रीने हा लूक एका अवॉर्ड फंक्शनसाठी केलेला होता.
स्नेहा वाघच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करी आहे.
अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.