Shruti Kadam
प्रिन्स नरुला आणि युविका चौधरीची प्रेमकहाणी बिग बॉस ९ च्या घरात सुरू झाली. नंतर त्यांनी लग्न केले. आता प्रिन्स आणि युविकाची एक गोड मुलगी आहे.
अली गोनी आणि जास्मिन भसीन बिग बॉस १४ मध्ये जोडीदार होते.
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे देखील बिग बॉस १५ च्या घरात एकमेकांच्या प्रेमात पडले.
सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल बिग बॉस १३ मध्ये एकत्र होते. घराबाहेर पडल्यानंतरही दोघेही एकत्र राहिले आणि त्यांच्या लग्नाच्या चर्चाही रंगल्या होत्या.पण २०२१ मध्ये सिद्धार्थचे निधन झाले, त्यानंतर शहनाज एकटी पडली.
पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांची बिग बॉस १४ च्या घरात जोडी जमली. घराबाहेर पडल्यानंतर दोघेही काही वर्षे एकत्र होते पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.
गौहर खान आणि कुशल टंडन बिग बॉस ७ च्या घरात एकत्र होते. घराबाहेर पडल्यानंतर ते बराच काळ एकत्र होते. त्यांनी 'जरूरी था' या संगीत अल्बममध्येही काम केले. पण नंतर हे कपल वेगळे झाले.
राकेश बापट आणि शमिता बिग बॉस ओटीटी (२०२२) मध्ये एकत्र आले होते. घराबाहेर पडल्यानंतर ते बराच काळ एकत्र होते. पण नंतर परस्पर संमतीने त्यांचे ब्रेकअप झाले.
सारा खान आणि अली मर्चंट बिग बॉस ४ च्या घरात एकत्र आले होते. बिग बॉसच्या घरात त्यांचे लग्न झाले पण घराबाहेर पडल्यानंतर ते वेगळे झाले.
Salman Khan : सलमान खानचं खरं नाव माहितीये का?