Chetan Bodke
अखेर काल बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'बिग बॉस १७'चा प्रेक्षकांना विजेता स्पर्धक मिळाला आहे.
'बिग बॉस १७'च्या विजेते पदावर स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी याने आपलं नाव कोरलं आहे.
यावेळी मुनव्वरला बिग बॉसची ट्रॉफी आणि ५० लाख रुपयांचा चेक बक्षीस म्हणून मिळाले आहे.
मुनव्वर फारुकीला सर्वात मोठं बक्षिस त्याच्या वाढदिवशीच मिळालं आहे.
मुनव्वर फारूकी 'बिग बॉस ओटीटी २'मध्येही सहभागी झाला होता.
मुनव्वर स्टँडअप कॉमेडियन, कवी, रॅपर असून तो मुळचा गुजरातचा आहे.
खरंतर, मुनव्वरकडे ८ कोटींची संपत्ती असून तो एका शोसाठी ३ ते ४ लाख रूपये इतके मानधन आकारतो.
मुनव्वर फारूकी युट्यूबवर अनेक कॉमेडी व्हिडीओज शेअर करत असतो, तो युट्यूबवरून ८ लाखांहून अधिक पैसे कमावतो.
मीडिया रिपोर्टनुसार, मुनव्वर एका प्रमोशनल इन्स्टा पोस्टसाठी १५ लाख रुपये इतके मानधन आकारतो.