Priya More
'बिग बॉस 13' मधील लव्ह बर्ड्स आणि स्टार कपल असीम रियाझ आणि हिमांशी खुराना सध्या चर्चेत आले आहे.
आसिम रियाझ आणि हिमांशी खुराना यांनी बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशीपनंतर ब्रेकअप केला आहे.
हिमांशी खुरानाने सोशल मीडियावर पोस्ट करत इतकी वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय का घेतला? यामागचे कारण देखील सांगितले आहे.
अभिनेता आसिम रियाझ आणि पंजाबी गायिका हिमांशी खुराना यांच्या ब्रेकअपची अधिकृत माहिती समोर आल्यानंतर दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला.
हिमांशी खुरानाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्रेकअपसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
'आम्ही आता एकत्र नाही आहोत. आम्ही एकत्र घालवलेला वेळ खूप चांगला होता. पण आता आम्ही एकत्र नाही.', असे तिने सांगितले.
'आपापल्या धर्माचा आदर करत असताना, आपल्या वेगवेगळ्या धार्मिक समजुतींमुळे आम्ही आमच्या प्रेमाचा त्याग करत आहोत.', असं देखील ती म्हणाली.
हिमांशी आणि असीम यांची भेट 'बिग बॉस 13' च्या घरामध्ये झाली होती.
बिग बॉसच्या घरामध्ये दोघांची जवळीक वाढली आणि त्यांनी टीव्हीवर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले.
चाहते या कपलला प्रेमाने ‘असिमांशी’ म्हणायचे. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतरही हे कपल अनेकदा एकत्र स्पॉट झाले.