Manasvi Choudhary
रविवारी अंडा भुर्जी पाव खायचा बेत अनेकजण करतात.
अंडा भुर्जी खायला सर्वांनाच आवडते.
अंडा भुर्जी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
अंडा भुर्जी बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, अंडी, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मिरची पावडर, पावभाजी मसाला, मीठ, तेल, हळद हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो सर्व बारीक कापून घ्या
गॅसवर कढईमध्ये गरम तेलात मिरची परतून घ्या नंतर यामध्ये कांदा घाला.
कोथिंबीर देखील तुम्ही घालू शकता अथवा कच्ची कोथिंबीर आवडत असेल तर भुर्जी शिजल्यानंतर घाला
नंतर या मिश्रणात चवीनुसार मीठ, सर्व मसाले आणि हळद घाला. मसाले परतल्यानंतर त्यात टोमॅटो घालून सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्या.
संपूर्ण मिश्रण शिजल्यानंतर मंद आचेवर त्यात अंडी फोडून घ्या अंडी व्यवस्थित मिक्स करून घ्या
अशाप्रकारे भुर्जी खाण्यासाठी तयार आहे. गरमा गरम भुर्जी पावसोबत भुर्जी सर्व्ह करा.