Shreya Maskar
हिवाळ्यात वीकेंडला जोडीदारासोबत किल्ल्यावर ट्रेकिंगचा प्लान करा. येथे तुम्हाला मजा-मस्ती करता येईल. तसेच इतिहासाची उजळणी होईल.
भूपतगड किल्ला महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आहे. हा किल्ला जव्हारपासून जवळ आहे.
भूपतगड किल्ला त्र्यंबक-वाडा प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असावा, असे मानले जाते.
भूपतगड किल्ल्याच्या माथ्यावर हनुमानाची मूर्ती आणि पाण्याची टाकी आहे. किल्ल्यावरून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
भूपतगड किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय आहे. भूपतगड किल्ला इतर ट्रेकिंगच्या ठिकाणांपेक्षा तुलनेने सोपा आहे.
पालघर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने भूपतगड किल्ल्यावर जाऊ शकता. तुम्ही सकाळी येथे जा. म्हणजे संपूर्ण दिवसात एक ट्रिप होईल.
छत्रपती शिवाजी महाराजांनी भूपतगड किल्ला स्वराज्यात समाविष्ट केला होता. याचा उपयोग टेहळणी बुरूज म्हणून केला जात असे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.