ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भोसरी हे नाव ऐकताच अनेकांना हसू आवरत नाही. परंतु भोसरी गावाची कहाणी अभिमानाची आणि परिवर्तनाची आहे.
पुण्यापासून १७ किलोमीटर लांब असलेले भोसरी गाव हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येते.
ऐतिहासिकदृष्ट्या भोसरी हे एक महत्वाचे स्थान राहिले आहे. भोसरी गावाचा इतिहास शतकानुशतके जुना आहे.
असे मानले जाते की, भोसरी गावाचे आधीचे नाव भोजापूर असे होते. राजा भोज यांची ही राजधानी होती. राजा भोजची राजधानी असल्याने, प्राचीन काळात त्याचे सांस्कृतिक आणि राजकीय महत्त्व होते.
भोसरी गावाचा इतिहास खूप प्राचीन आहे. प्राचीन काळापासून या गावाला भवसरी, भोजापूर अशा नावाने देखील ओळखत असत.
असे मानले जाते की, ८व्या शतकात राष्ट्रकुट राजवटीत भोसरीला संस्कृतमध्ये भेउसरी असे म्हटले जात होते.
कालांतराने, या नावात अनेक बदल झाले जसे की, भोजापुरी ते भोसावरी आणि शेवटी आपण आता भोसरी म्हणून ओळखतो.