Manasvi Choudhary
पारंपारिक पद्धतीची भोगीची भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही सहज ही रेसिपी घरी बनवू शकता.
पारंपारिक पध्दतीची भोगीची भाजी बनवण्यासाठी शेंगा, ओला हरभरा, ओला वटाणा, तुरीचे दाणे, गाजर, घेवडा, शेंगदाणे, बटाटे, वांगी, बोरं, पेरू, तीळ, सुके खोबरे, खसखस, लसूण- कोथिंबीर, मसाले, हळद हे मीठ हे साहित्य एकत्र करा.
भोगीची भाजी बनवण्यासाठी सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. एका प्लेटमध्ये भाज्या वेगवेगळ्या ठेवा.
गॅसवर कढईमध्ये पांढरे तीळ, सुके खोबरे, खसखस, शेंगदाणे हे कोरडे भाजून घ्या. नंतर मिश्रणात आले-लसूण-कोथिंबीर घालून थोडे पाणी टाकून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता परतून घ्या. नंतर यात तयार वाटण मिक्स करा आणि चांगले परतून घ्या.
नंतर या संपूर्ण मिश्रणात हळद, मसाला, काळा मसाला, चवीनुसार मीठ हे मिक्स करा. मिश्रणात बारीक चिरलेल्या भाज्या मिक्स करा.
संपूर्ण मिश्रणात गरम पाणी घाला आणि भाजी चांगली शिजवून घ्या नंतर यात पांढरे तीळ मिक्स करा आणि भाजीला झाकण लावा.
तयार भाजीवर कोथिंबीर आणि गुळ घाला म्हणजेच भाजी आणखी चवदार होते.