Shreya Maskar
तुम्ही पावसाळ्यात ४-५ दिवसांची कोकण ट्रिप नक्की प्लान करा. कारण पावसाळ्यात कोकणचे सौंदर्य खुलून येते. रस्ते हिरवेगार जंगल, पावसाच्या पाण्याने बहरून येतात.
कोकणात गेल्यावर सिंधुदुर्ग येथील भोगवे बीचला नक्की भेट द्या. हा बीच कुडाळ तालुक्यातील 'परुळे' गावात असून, मालवण आणि तारकर्लीपासून दक्षिणेस साधारणपणे १५ ते २५ किलोमीटर अंतरावर वसलेला आहे.
पावसाळ्यात येथील मातीचा सुगंध तुमचे मन मोहून टाकेल. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
भोगवे बीच येथील स्वच्छ पांढरी वाळू, शांत आणि व्यावसायिक गर्दीपासून दूर असलेले वातावरण, तसेच कारली नदी आणि अरबी समुद्र यांचा विलोभनीय संगम यांसाठी प्रसिद्ध आहे.
हे ठिकाण डॉल्फिनचे दर्शन, स्वच्छ पाणी आणि सूर्यास्ताच्या नयनरम्य दृश्यांसाठी ओळखले जाते. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
जिथे कारली नदी खुल्या समुद्राला मिळते, तिथे एक अद्वितीय किनारी निसर्गदृश्य निर्माण होते. समुद्राच्या वाळूत लहान मुल खेळण्याचा आनंद घेताना दिसतात.
भोगवे बीचजवळच निवती बीच आणि ऐतिहासिक निवती किल्ला वसलेला आहे. येथे मित्रांसोबत धमाल-मजामस्ती करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.