Shreya Maskar
भेंडीचे कुरकुरीत चिप्स बनवण्यासाठी भेंडी, तेल, लाल तिखट, हळद, धने पूड, जिरे पूड, चाट मसाला, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
भेंडीचे कुरकुरीत चिप्स बनवण्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून मध्ये चिरून दोन भाग करून घ्या.
बाऊलमध्ये भेंडी, तेल, लाल तिखट, हळद, धने पूड, जिरे पूड, चाट मसाला आणि मीठ घालून व्यवस्थित एकजीव करा.
बेकिंग शीटवर भेंडीचे काप पसरवून घ्या.
ओव्हनमध्ये 15-20 मिनिटे भेंडी बेक करा.
तुम्ही भेंडीचे काप तेलात देखील खरपूस तळू शकता
गरमागरम भेंडीचे चिप्स कोथिंबीरने सजवून सर्व्ह करा.
भेंडी अजून कुरकुरीत बनवण्यासाठी तुम्ही यात रवा देखील टाकू शकता.