Shreya Maskar
घरीच अवघ्या 10 मिनिटांत विड्याच्या पानांचा मुखवास बनवा.
विड्याच्या पानांचा मुखवास बनवण्यासाठी विड्याची पानं, बडीशेप, धना डाळ, गोड बडीशेप, टूटी फूटी, चेरी, गोड सुपारी, डेसिकेटेड कोकोनट, गुलकंद आणि खडीसाखर इत्यादी साहित्य लागते.
विड्याच्या पानांचा मुखवास बनवण्यासाठी सर्वप्रथम खायची पानं पाण्याने स्वच्छ धुवून देट कापून घ्यावेत.
आता एक दिवस ही पाने व्यवस्थित वाळवून घ्या.
एका बाऊलमध्ये भाजलेली बडीशेप, धना डाळ, गोड बडीशेप, टूटी फूटी, चेरी मिक्स करून घ्या.
यात गोड सुपारी, डेसिकेटेड कोकोनट, खडीसाखर आणि गुलकंद घाला.
आता यात खायची पानं क्रश करून घाला.
विड्याच्या पानांचा मुखवास हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये 3 ते 4 महिन्यांसाठी तुम्ही स्टोअर करुन ठेवू शकता.