Shruti Vilas Kadam
भावाला स्टायलिश आणि उपयोगी गिफ्ट द्यायचे असेल तर सुंदर घड्याळ हा उत्तम पर्याय आहे. त्याच्या आवडीनुसार फॉर्मल, कॅज्युअल वॉच निवडू शकता. हे गिफ्ट तो रोज वापरू शकतो.
भावाला भाऊबीजेला वॉलेट गिफ्ट करणे हा एक चांगला पर्याय आहे. बाजारात वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि डिझाइन्समध्ये लेदर वॉलेट उपलब्ध आहेत. त्याच्या आवडीनुसार तुम्ही सुंदर आणि टिकाऊ वॉलेट निवडू शकता.
तुमच्या भावाला परफ्यूमची आवड असेल तर त्याला छान सुगंधाचा परफ्यूम गिफ्ट करा. त्याच्या आवडीनुसार फ्रेश, माइल्ड किंवा स्ट्राँग फ्रॅग्रन्स निवडू शकता. हे गिफ्ट त्याला नक्की आवडेल.
भावासाठी स्मार्टवॉच देणं हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये वेळ पाहण्यासोबतच फिटनेस ट्रॅकिंग, स्टेप काउंट, हार्ट रेट आणि नोटिफिकेशन यांसारख्या सुविधा मिळतात.
भावाला गाणी ऐकायला आवडत असेल तर वायरलेस इअरबड्स गिफ्ट करू शकता. प्रवासात, ऑफिसमध्ये किंवा व्यायाम करताना त्याचा चांगला उपयोग होईल.
भावाला एखादे खास आणि आठवणीत राहणारे गिफ्ट द्यायचे असेल तर तुमच्या दोघांचा सुंदर फोटो फ्रेम करून द्या. हे गिफ्ट भावासाठी खूप खास ठरेल.
भावाला स्वतःची काळजी घ्यायला आवडत असेल तर त्याला ग्रूमिंग किट गिफ्ट करा. यामध्ये शेव्हिंग क्रीम, फेस वॉश, मॉइश्चरायझर, बिअर्ड ऑइल आणि इतर उपयोगी वस्तूंचा समावेश करू शकता.