ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवाळीत भाऊबीज हा सण साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी केली.
भाऊबीज या सणाला बहीण भावाला ओवाळते त्याला दिर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करते.
पौराणिक कथेनुसार, भाऊबीजच्या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी गेले. तेव्हापासून भाऊबीज या सण साजरा केला जातो.
यमुराज बहिण यमुनेच्या घरी गेल्यानंतर तिने माथ्यावर टिळक लावले व भावाला सुखी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यानंतर यमराजांनी बहीण यमुनेला वरदान मागायला सांगितले तेव्हा यमुना म्हणाली की दरवर्षी या दिवशी माझ्या घरी या आणि मी तुला टिळा लावेल आणि आशीर्वाद देईल.
बहीण यमुनेचे बोलणे ऐकून यमराज अतिशय प्रसन्न झाले आणि तिला आशीर्वाद दिला.
दुसऱ्या अख्यायिकेनुसार भाऊबीजच्या दिवशी नरकासुर या राक्षसाचा वध करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले.
या दिवशी भगवान श्री कृष्णाची बहीण सुभद्रा यांनी फळे, फुले आणि मिठाई तसेच दिवे लावून त्यांचे स्वागत केले.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.