Bharli Vangi Recipe: घरच्या घरी बनवा अस्सल गावरान भरली वांगी; चव चाखून प्रत्येकजण करेल कौतुक

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

भरली वांगी बनवण्यासाठी लहान जांभळी वांगी, शेंगदाण्याचे कूट, सुके खोबरे, तीळ, कांदा, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, गोडा मसाला, हळद, मीठ, तेल आणि कोथिंबीर घ्या.

Bharli Vangi Recipe | yandex

वांगी स्वच्छ धुऊन घ्या

लहान वांगी स्वच्छ धुऊन त्यांना देठासह चार भागांत उभ्या चिरा द्या. मात्र, वांग्याचे तुकडे पूर्णपणे वेगळे होणार नाहीत याची काळजी घ्या.

Bharli Vangi Recipe | Saam Tv

भाजून मसाला तयार करा

कढईत शेंगदाणे, सुके खोबरे आणि तीळ वेगवेगळे भाजून घ्या. ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यात लाल तिखट, हळद, गोडा मसाला, मीठ आणि थोडी आले-लसूण पेस्ट मिसळा.

Bharli Vangi Recipe | Yandex

वांग्यांमध्ये मसाला भरा

तयार मसाल्यात थोडे पाणी घालून घट्ट मिश्रण बनवा. हे मिश्रण चिरलेल्या वांग्यांमध्ये व्यवस्थित भरा. उरलेला मसाला भाजीच्या रस्स्यासाठी बाजूला ठेवा.

Bharli Vangi

कांदा परतून घ्या

कढईत तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परता. त्यानंतर त्यात उरलेला मसाला घालून काही मिनिटे परतून घ्या.

bharli vangi

वांगी शिजवून घ्या

मसाल्यात भरलेली वांगी कढईत अलगद ठेवा. थोडे पाणी घालून झाकण ठेवा आणि मंद आचेवर वांगी मऊ होईपर्यंत शिजवा. मध्येच आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि वांगी तुटणार नाहीत याची काळजी घ्या.

bharli vangi

कोथिंबीर घालून गरमागरम वाढा

वांगी पूर्ण शिजल्यावर वरून चिरलेली कोथिंबीर घाला. चविष्ट आणि मसालेदार भरली वांगी तयार आहेत. गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत त्याचा आस्वाद घ्या.

bharli vangi

Dark Underarms Tips: काळपट अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी 7 टिप्स; अशी घ्या काखेच्या त्वचेची काळजी

Dark Underarms Tips | Saam Tv
येथे क्लिक करा