Siddhi Hande
वांग्याची भाजी म्हटली की अनेकजण नाक मुरडतात. परंतु तुम्ही जर भरली वांगी केलीत तर सर्वांनाच आवडेल.
वांगी, शेंगदाण्याचा कूट, सुके खोबरे, तीळ, गोडा मसाला, कांदा, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर, हिंग, मोहरी, तेल
सर्वात आधी तुम्हाला वांगी स्वच्छ धुवायची आहेत. देठाचे काटे काढून टाका. यानंतर वांग्याचे ४ भाग करा.
वांगी मीठाच्या पाण्यात भिजत ठेवा. जेणेकरुन ती काळी पडणार नाही.
यानंतर तुम्हाला मसाला बनवायचा आहे. त्यासाठी एका भांड्यात शेंगदाण्याचा कूट, खोबरे, तीळ, गोडा मसाला टाकायचा आहे.
यामध्ये तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि मीठ टाका. यात थोडं तेल टाकून एकजीव करा.
यानंतर हा मसाला वांग्यांमध्ये दाबून भरा.
यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि कांदा परतून घ्या. यानंतर तेलात भरलेले वांगी टाका.
वांगी २-३ मिनिटे शिजवून घ्या. उरलेला मसाला टाकून त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाका.
यानंतर झाकण ठेवून बारीक आचेवर वांगी शिजवून घ्या.
भरली वांगी तयार झाल्यावर त्यावर कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.