Shraddha Thik
मराठी मनोरंजन विश्वातील चतुरस्त्र अभिनेते भरत जाधव यांचा आज वाढदिवस.
भरत जाधव यांनी आजवर अनेक मालिका, सिनेमा, नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय.
भरत जाधव यांचे रंगभूमीवर गाजलेले नाटक म्हणजे 'श्रीमंत दामेदर पंत'. याचा पुढे चित्रपटही करण्यात आला.
'श्रीमंत दामेदर पंत'या नाटकासह चित्रपटाला सुद्धा तेवढाच प्रतिसाद मिळाला.
एकाच वेळी दोन पात्र साकारणाऱ्या भरत जाधवने प्रेक्षकांची दाद मिळवलीच मात्र या नाटकामुळे सातासमुद्रापार एक वेगळीच ओळख मिळाली.
दामू, शांता, गणपत, सुमन, लखोबा ही सगळी पात्र अजरामर ठरली. परंतू दामू हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं.
भरत यांच्या दामू पात्रातील 'गोड गोजिरी लाज लाजिरी' या गाण्यावरचे नृत्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली.
भरत यांनी नुकतंच लंडन मिसळ सिनेमात अभिनय केलाय. याशिवाय त्यांचं सध्या रंगभूमीवर अस्तित्व हे नाटक गाजतंय.