Shreya Maskar
ठाणे जिल्ह्यात भंडारगड किल्ला आहे. हा एक ऐतिहासिक डोंगर किल्ला असून तो शहापूर तालुक्यात माहुली आणि पळसगड यांच्या समूहात येतो.
भंडारगड किल्ला 'तानसा' वन्यजीव अभयारण्यामध्ये वसलेला आहे. हा किल्ला महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. वीकेंडला तुम्ही येथे नक्की फिरायला जाऊ शकता.
मुंबईपासून साधारणपणे ८० किलोमीटर अंतरावर असलेला भंडारगड किल्ला एक लोकप्रिय वन डे ट्रिप लोकेशन आहे. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद देखील घेऊ शकता.
एका विशाल पर्वतरांगेच्या माथ्यावर वसलेल्या या किल्ल्याची मुख्य आकर्षणे म्हणजे 'कल्याण दरवाजा' हे प्रवेशद्वार, तानसा वन्यजीव अभयारण्यातील हिरवीगार निसर्गसृष्टी आणि वजीर, भटोबा व नवरा-नवरी यांसारख्या पर्वतीय सुळक्यांची नयनरम्य दृश्ये होय.
भंडारगड किल्ल्याच्या माथ्यावरून कळसूबाई, अलंग-मदन-कुलंग आणि हरिश्चंद्रगड यांसारख्या प्रमुख शिखरांचे स्पष्ट आणि ३६०-अंशांचे दृश्य दिसते. हा एक अद्भूत नजारा आहे.
भंडारगड किल्ला माहुली किल्ल्याचा एक मोक्याचा रक्षक किल्ला म्हणून कार्यरत होता. शहाजी राजे आणि शिवाजी महाराज यांच्या राजवटीत हे एक महत्त्वाचे रणांगण ठरले होते. १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला.
भंडारगडला जाण्यासाठी जवळचे स्टेशन आसनगाव हे आहे. आसनगाव स्टेशनला उतरून पुढे रिक्षाने तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी उतरू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.