Siddhi Hande
आतापर्यंत तुम्ही कांदा, बटाटा, मूगभजी खाल्ले असतील. हे भजी तेलकट होतात.
आज आम्ही तुम्हाला अशा भजींची रेसिपी सांगणार आहोत जे भजी आजिबात तेलकट होत नाहीत.
भजी बनवण्यासाठी बटाटे, साबुदाणा पीठ, वरई पीठ, मीठ, जिरे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे साहित्य लागणार आहे.
सर्वात आधी बटाटा किसून घ्यायचा आहे.
यानंतर बटाट्याचा किस छान स्वच्छ धुवून घ्या. यातील पाणी काढून टाका.
एका भांड्यात बटाट्याचा किस, साबुदाणा पीठ, वरईचं पीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर टाका. या मिश्रणात आवश्यकतेनुसार मीठ टाका.
हे सर्व मिश्रण छान एकजीव करा. त्यात आवश्यकतेनुसार थोड पाणी टाका.
यानंतर कढईत तेल गरम करा. यात या मिश्रणाचे भजी सोडा.
यानंतर भजी छान तळून घ्या. हे भजी आजिबात तेलकट होत नाही.