Bhagavad Gita: भगवद्गीतेचा तिसरा अध्याय कोणती शिकवण देतो?

Shruti Vilas Kadam

कर्म करत राहण्याचे महत्व


भगवद्गीतेचा तिसरा अध्याय कर्मयोग या नावाने ओळखला जातो. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कोणतेही कार्य न करता फक्त ध्यान किंवा वैराग्याने मोक्ष प्राप्त होत नाही. कर्म करत राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

Bhagavad Gita

निष्काम कर्म म्हणजेच निस्वार्थ सेवा


श्रीकृष्ण सांगतात की कर्म करताना त्याचे फळ अपेक्षेनं करू नये. आपले कर्म निस्वार्थपणे, ईश्वराला अर्पण करत केल्यास ते मोक्षमार्ग बनते.

Bhagavad Gita

यज्ञभावना आणि समाजाचे हित


प्रत्येकाने आपले कर्म यज्ञभावनेने करावे, म्हणजेच समाजाच्या कल्याणासाठी. ही भावना आपणास स्वार्थापेक्षा परमार्थाकडे घेऊन जाते.

Bhagavad Gita

कर्तव्य टाळणे म्हणजे पाप


आपले नैतिक कर्तव्य टाळणे किंवा आळशी राहणे हे अधर्मासारखेच आहे. कर्म न करणे ही स्वतःच्या आत्म्याशी बेईमानी ठरते.

Bhagavad Gita

श्रेष्ठ पुरुषांचे आदर्श


श्रीकृष्ण म्हणतात की श्रेष्ठ व्यक्तींनी कर्म करत राहावे, कारण समाज त्यांचे अनुकरण करतो. आदर्श स्थापनेसाठी कर्तव्यपालन आवश्यक आहे.

Bhagavad Gita

इंद्रियांचे संयमन


इच्छा, राग, लोभ यांसारख्या इंद्रियांच्या मोहात न अडकता, संयम ठेवणे आणि विवेकपूर्वक कर्म करणे ही कर्मयोगाची गरज आहे.

Bhagavad Gita

भगवंताच्या इच्छेनुसार कर्म


कर्म करताना आपण 'मी करतो' असा अहंकार बाळगू नये. सर्व कर्म हे भगवंताच्या इच्छेप्रमाणे होत आहे, अशी भावना ठेवावी.

Bhagavad Gita

Ahaan Panday Girlfriend: सैयारामधल्या अहान पांडेची 'ही' आहे खरी गर्लफ्रेंड..?

Ahaan Panday Girlfriend
येथे क्लिक करा