Shruti Vilas Kadam
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे ज्ञान त्यांनी सूर्यदेवाला दिलं होतं आणि याच ज्ञानाची परंपरा ऋषीमुनींनी पुढे नेली.
श्रीकृष्ण स्पष्ट करतात की जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढतो तेव्हा ते स्वतः अवतार घेतात – "परित्राणाय साधूनाम्..."
कर्म करताना फळाची अपेक्षा न ठेवता निःस्वार्थ भावनेने काम करा, हे या अध्यायात विशेषत्वाने सांगितले आहे.
कर्म करत असताना योग्य ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. अज्ञानामुळे माणूस मोहात अडकतो.
योग्य आचरण, संयम आणि समर्पण यांद्वारे कर्मयोगी होण्याचा मार्ग या अध्यायात स्पष्ट केला आहे.
ज्ञान म्हणजे दीप आहे जो अज्ञानाचा अंधार दूर करतो. "ज्ञानेन तु तदज्ञानं" असे भगवंत सांगतात.
ज्ञान प्राप्त करण्यासाठी सद्गुरूचा सल्ला घ्या आणि नम्रतेने त्यांची सेवा करा, असे श्रीकृष्ण सांगतात – "तद्विद्धि प्रणिपातेन..."